Government Holiday this month : राज्यात सध्या गणपतीचा उत्सव सुरू आहे. येथे मंगळवारी आनंद चतुर्थी आहे. आणि बाप्पाचा विसर्जन ही होणार आहे. त्यासोबतच सोमवारी ईद-ए-मिलाद हा सण सुद्धा आहे. आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सोमवारी सुट्टी देखील आहे. परंतु हा बाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे ही सुट्टी रद्द केली आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली नवीन योजना मिळणार दरमहा इतका पगार?
ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण आहे.यावेळी जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. दरम्यान 17 सप्टेंबर 2024 रोजी आनंद चतुर्थी आहे. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याचे उद्देशाने ईद-ए-मिलाची सुट्टी बुधवारी देण्यात येणार आहे. असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.Government Holiday this month
हे पण वाचा :- राज्य सरकार या लाडक्या बहिणीकडून करणार पैसे वसूल काढला नवीन नियम !
मुंबई शहर ,मुंबई उपनगर, आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये बुधवार जुलूस काढण्याचा कार्यक्रम करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतलेला आहे. त्यामुळे ही सुट्टी बुधवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 18 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावे असा निर्णय घ्यावा असे प्रशासन विभागाने कळविले आहे. आणि हा निर्णय पक्का आहे. म्हणून आता ईद-ए-मिलाद ची सुट्टी बुधवारी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मोफत मिळणार करा फक्त हे काम ! राज्य सरकारची नवीन मोठी घोषणा
सरकारी कर्मचाऱ्यांना लॉंग वीकेंड मिळणार आहे. आनंद चतुर्थीची आणि ईद ची सुट्टी लागोपाठ आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सलग सुट्टी मिळणार आहे. सर्व सरकारी कर्मचारी आनंदित आहेत. महाराष्ट्र सरकारने मुस्लिम आणि हिंदू बांधवांमध्ये सलोखा राहवा यामुळे हा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणून राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्याला 18 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा असे आदेश दिले आहेत.