या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे मिळणार 103 कोटी रुपये पहा जिल्ह्यानुसार याद्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kharip pik vima yojna : खरीप 2023 मध्ये पिक विमा कंपनीने कोणतेही कारण न देता जवळपास दीड लाखावर शेतकऱ्यांचे विमा अर्ज नाकारले होते. परंतु पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाकारलेल्या सर्व अर्जाची पुन्हा पडताळणी करून विमा रक्कम द्यावी असे निर्देश विमा कंपनीला दिले होते.त्यानुसार विमा कंपनीने नाकारलेले अर्जाची पुन्हा पडताळणी करून एक लाख 78 हजार शेतकऱ्यांचे बँक खात्यावर 103 कोटी 74 लाख रुपये जमा केले आहेत.यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

👇👇👇👇

बीड जिल्ह्यात 2023/ 24 च्या खरीप हंगामात जवळपास 400 कोटी रुपये पिक विमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला होता. तर पिक विमा कंपनीने अंबाजोगाई ,परळी च्या काही तालुक्यातील महसूल मंडळामध्ये कोणते ही कारण न देता जवळपास दीड लाख शेतकऱ्यांचे विमा अर्ज नाकारल्याचे निर्देशास आले होते.कोणते तांत्रिक कारण किंवा कोणताही त्रुटी न देता ते सर्व अर्ज कंपनीने मंजूर करून त्या शेतकऱ्यांना देखील त्यांचा प्रलंबित पीक विमा वितरित करावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऑगस्ट महिन्यात दिले होते.

👇👇👇👇

त्यानुसार पिक विमा कंपनीने नाकारलेल्या सर्व पिक विमा अर्जाची पुन्हा पडताळणी केली व विमा रक्कम जमा केले. दरम्यान मागच्या आठवड्यात गुरुवारपासून ही रक्कम संमती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली होती.जवळपास हे काम पूर्ण झाले आहेत.ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे याचा गरजू शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.Kharip pik vima yojna

तर मित्रांनो अतिवृष्टी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर. शेतात पाणी साठणे, यास इतर बाबतच्या तक्रारी 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ अतिवृष्टी झाली तर 72 तासाचे आत याची माहिती विमा कंपनीला देणे अपेक्षित आहे .वेळेवर तक्रारी आल्या नाहीत किंवा असं संबंधित तक्रारी असतील तर विमा कंपनी तक्रारी नाकारते .मागचे खरीप हंगामात सुद्धा असेच प्रकार झाले होते. त्यामुळे दीड लाखावर शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार विमा कंपनीने विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. तर पुढील कंपनीकडून माहिती सांगण्यात आलेली आहे,की याच्यापुढे तुम्ही नुकसानीचे तक्रारी 72 तासाच्या आतच करावे ते आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. थोडासुद्धा उशीर झाला असेल तर तुम्हाला पिक विमा मिळणार नाही.

👇👇👇👇

बीड जिल्ह्यात वर्ष 2023 आणि 24 च्या खरीप व रब्बी हंगामात एकूण 400 कोटी रुपये पिक विमा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी आजपर्यंत 378 कोटी 21 लाख रुपयांची वितरण संबंधी शेतकऱ्यांचे बँक खाते करण्यात आले आहे. तर वरून वितरण विमा कंपनीने कोणतेही कारण न देता 31 ऑगस्ट च्या पूर्ण करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी. पिक विमा कंपनीस ऑगस्ट महिन्यात दिले होते त्यानुसार आतापर्यंत एकूण 392 कोटी 78 लाख रुपये पिक विमा शेतकऱ्यांची बँक खाते जमा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो उर्वरित विमा रक्कम जमा होणार असल्याचे समजते.तसेच विमा कंपनीने पुन्हा पडताळणी करून एक लाख 38 हजार शेतकऱ्यांची बँक खात्यावर 103 कोटी 14 लाख रुपये जमा केले आहेत असे कंपनीचे म्हणणे आहे.

👇👇👇👇

या योजनेपासून शेतकऱ्यांना भक्कम आधार मिळाला आहे. आणि ही रक्कम शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात कामाला येणार आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षी झालेल्या पीक नुकसानाची रक्कम विम्याचे माध्यमातून मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राज्य शासनाकडून मागच्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचे भाव पडले असल्याने. शेतकऱ्याला अर्थसहाय देण्यात येत आहे.तर बीड जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकऱ्यांचे बँक खात्यावर 160 कोटी रुपये जमा होत आहे.यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

👇👇👇👇

1 thought on “या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे मिळणार 103 कोटी रुपये पहा जिल्ह्यानुसार याद्या”

Leave a Comment

error: Content is protected !!