PM Kisan Samman Nidhi Yojana 2024 : या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 18 व्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपये अनुदान! पात्र शेतकऱ्यांची यादी पहा
हा हप्ता ऑक्टोंबर 2024 मध्ये जारी केला जाऊ शकतो. यापूर्वी जून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरावा हप्ता जारी केला होता. पंतप्रधान मोदी यांनी 18 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 9.26 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सतरावा हप्ता म्हणून 21 हजार कोटीहून अधिक रक्कम जारी केली होती. तर यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सोळावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता.PM Kisan Samman Nidhi Yojana 2024
या योजनेचे फायदे काय आहेत ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांना दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एप्रिल -जुलै ,ऑगस्ट- नोव्हेंबर ,आणि डिसेंबर- मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिले जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. ही योजना 2019 च्या अंतिम अर्थसंकल्पात तात्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती. ही आता जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना बनली आहे.
लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे तारिक फिक्स
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई -केवायसी आवश्यक आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची.ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. योजनेच्या अधिकृत वेबसाईट नुसार पी एम किसान मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई -केवायसी अनिवार्य आहे. ओटीपी आधारित ई -केवायसी पी एम किसान पोर्टल वर उपलब्ध आहे. किंवा मग बायोमेट्रिक ई- केवायसी साठी जवळचे सीएससी केंद्राशी संपर्क साधला जाऊ शकतो.
लाभार्थ्यांना कशी तपासता येईल त्यांची अर्जाची स्थिती?
Pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. Know your status वर क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक कॅपच्या कोड प्रविष्ट करा. आणि गेट डाटा पर्याय निवडा. तुमची अर्जाची स्थिती तुमच्या समोर येईल.
जन धन योजनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकार देणार या खातेधरकाना 10,000 हजार रुपये
तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही? कसे तपासणार.
पी एम किसान चे अधिकृत वेबसाईटला भेट द्या.www.Pmkisan.gov.in यावर क्लिक करा. राज्य जिल्हा ,उपजिल्हा, ब्लॉक, आणि गाव निवडा. गेट रिपोर्ट वर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थी यादी दिसेल. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक 155261 आणि 011-24300606 या क्रमांकावर संपर्क साधा. नक्की तुमची शंका दूर होईल.
6 thoughts on “या दिवशी 4,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pm किसान योजनेचे पैसे ! यादी पाहा”